Forest Department Action : भोकरदनमध्ये वन विभागाचा सर्जिकल स्ट्राईक; लाकूड जप्त

लाकूड माफियांमध्ये खळबळ ! ; ८ टन अवैध लाकूड हस्तगत
Forest Department Action
Forest Department Action : भोकरदनमध्ये वन विभागाचा सर्जिकल स्ट्राईक; लाकूड जप्तfile photo
Published on
Updated on

Forest Department Conducts 'Surgical Strike' in Bhokardan; Timber Seized

जालना, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन शहरातील संतोषी माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीविर-- ोधात वन विभागाने १ मे रोजी मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे टाकण्यात आलेल्या या छाप्यात सुमारे ८ टन बेकायदेशीर लाकूड जप्त करण्यात आले आहे. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील लाकूड तस्करांचे धाबे दणाणले असून खळबळ उडाली आहे.

Forest Department Action
Jalna News : वृक्षतोडी विरोधात आ. दानवे आक्रमक

झाडांची कत्तल आणि साठवणूक उघडगेल्या काही दिवसांपासून परिसरात झाडांची विनापरवाना बेसुमार कत्तल सुरू होती. याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने संतोषी माता मंदिर परिसरात छापा टाकला. या कारवाईत आंबा, निम (कडू लिंब) आणि भोकर या प्रजातींच्या झाडांची विनापरवाना तोड करून त्याची अवैध साठवणूक आणि वाहतूक केल्याचे उघड झाले.

पथकाने घटनास्थळावरून अंदाजे ३ टन गोल इमारती लाकूड आणि ५ टन जळाऊ - लाकूड असा एकूण ८ टन मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र वृक्ष अधिनियमांतर्गत गुन्हा दाखलया प्रकरणी महाराष्ट्र वृक्ष अधिनियम १९६४ अंतर्गत वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वन अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या लाकडाचा रीतसर पंचनामा केला.

Forest Department Action
औंढा तालुक्यात वन विभागाची मोठी कारवाई ! 2 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

यात सामील असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक (छत्रपती संभाजीनगर) सुवर्णा माने आणि सहायक वनसंरक्षक (जालना) सुदाम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व वनपरीक्षेत्र अधिकारी नीता फुले यांच्या नेतृत्व-खाली वन परिमंडळ अधिकारी योगेश डोमळे, वनरक्षक आनंद वरशील, संभाजी हटकर, सुदाम राठोड आदींनी केली.

बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची खैर नाही ! परिसरात कुठेही अवैध वृक्षतोड किंवा वनसंपत्तीचे नुकसान होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जातील आणि पर्यावरण हानी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.'
- नीता फुले, वनपरीक्षेत्र अधिकारी, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news