Jalna News : ६ सॉमिलसह अवैध लाकूड साठ्यावर धाड

५.६४१ घ.मी. लाकूड जप्त; जालना उत्तर वनपरिक्षेत्राची कारवाई
Jalna News : ६ सॉमिलसह अवैध लाकूड साठ्यावर धाड
Published on
Updated on

Raids on illegal timber stockpiles including 6 sawmills

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : वनपरिक्षेत्र जालना उत्तर (प्रादेशिक), वनपरिमंडळ भोकरदन अंतर्गत नियतक्षेत्रात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने कडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. विशेष गस्ती पथक तयार करून विविध ठिकाणी धाडी टाकत अवैधरित्या तोडलेल्या लाकडाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

Jalna News : ६ सॉमिलसह अवैध लाकूड साठ्यावर धाड
Forest Department Action : भोकरदनमध्ये वन विभागाचा सर्जिकल स्ट्राईक; लाकूड जप्त

या कारवाईत पाच सॉमिल आणि एका लाकूड साठ्यावर धाड टाकण्यात आली. धनक्षी सॉमिल राजुर येथे ८.५१३ घनमीटर, विश्वकर्मा सॉमिल भोकरदन येथे ५.४२१ घनमीटर, गुडलक सॉमिल भोकरदन येथे ११.०३७१ घनमीटर, के. के. टिंबर मार्ट सॉमिल येथे ७.२८७ घनमीटर आणि गिता सॉमिल भोकरदन येथे ५.६४१ घनमीटर अवैध लाकूड जप्त करण्यात आले.

या प्रकरणी अनुक्रमे वन अधिनियमान्वये नोंदविण्यात आले आहेत. भोकरदन-आलापूर रोडवर लाकूड साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने धाड टाकली. याठिकाणी अवैधरित्या तोडले ७.८६७ घनमीटर कडुनिंबाचे लाकूड आढळून आले मोहंमद जुनेद मोहंमद फईन रा. भोकरदन यांच्याविरुद्ध वन गुन्हा नोंद करून लाकूड जप्त करण्यात आले.

ही कारवाई वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सु. न. मुढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Jalna News : ६ सॉमिलसह अवैध लाकूड साठ्यावर धाड
illegal tree cutting : अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची धडक कारवाई ; कडुलिंब लाकडाचा साठा जप्त

यांनी राबवली मोहीम

वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर (प्रा.) श्रीमती नीता फुले यांच्या नेतृत्वात वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन वाय. एम. डोमळे, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, जयाजी म्हसु शिनगारे, घनश्याम गव्हाणे, मोमीन तडवी, अनुप तडवी आणि मंगेश संपकाळ यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news