Solapur news: मोहोळातील 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर' अचानक रद्द

कारण गुलदस्त्यात, नागरिकांमध्ये चर्चांना उधाण
Solapur news: मोहोळातील 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर' अचानक रद्द
Published on
Updated on

मोहोळ : येथे शुक्रवारी (दि. ३१ जुलै) घाटुळे मंगल कार्यालय येथे सकाळी १० वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले होते. ते अचानक रद्द करण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या शिबिरासाठी निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी , जिल्हाधिकारी, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी संसदीय खासदार ज्योती वाघमारे, खासदार प्रणिती शिंदे राजन पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार परिषद आमदार राजू खरे, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. आत्ता शेवट कार्यक्रम चालू होणार तेवढ्यात काही अपरिहार्य कारणामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यामागील कारण अद्याप समजू शकले नाही इतर बाहेर गावावरून खेडेगावातून नागरिक शेतकरी आले होते. तर काही जणांनी कामाचे खाडं करून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती.

Solapur news: मोहोळातील 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर' अचानक रद्द
Solapur News: घरकूलधारकांना मिळाली अवैध साठ्यातील वाळू मोफत

आता काही नागरिकांचे म्हणणे की, आम्ही हजेरी बुडवून आलो होतो. आता आमच्या कामाच्या खाड्याचे पैसे कोण देणार ?, असे खेड्यातून येणारे नागरिक बोलत होते. तहसीलदार सचिन मुळे त्यांना संपर्क साधला. त्यांनी फोन प्रतिसाद दिला नाही उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद होते. त्यामुळे शिबिराबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली.

Solapur news: मोहोळातील 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर' अचानक रद्द
Solapur news: मोहोळ शहरात रिक्षाचालकांना गणवेश अनिवार्य; बेकायदा स्टॉलधारकांवर कारवाईचा इशारा

विशेष म्हणजे, कार्यक्रम रद्द करण्यामागील नेमके कारण प्रशासन किंवा आयोजकांकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिबिर का रद्द करण्यात आले, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अनेक नागरिकांनी कार्यक्रम रद्द करण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित प्रशासन आणि आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्यामागील कारण तसेच शिबिर पुढे कोणत्या दिवशी आयोजित केले जाणार आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news