भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्राकडून अडीच कोटींचा निधी

भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्राकडून अडीच कोटींचा निधी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा, सोलापुरातील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन सुशोभीकरणासाठी केंद्राने अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे. अशी माहिती खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.

या किल्ल्याबाबत खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी शुक्रवारी (दि.6) महापालिकेत प्रशासक पी शिवशंकर यांची भेट घेतली. यावेळी माजी सभागृह नेता शिवानंद पाटील, नगरअभियंता संदीप कारंजे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भुईकोट किल्ल्याची पडझड होत आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती, जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. याकरिता केंद्र सरकारने अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे. या किल्ल्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पुरातत्व विभागाचे प्रमुख यादव हे लवकरच सोलापूरला येणार आहेत. या किल्ल्याचे देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी हा किल्ला महापालिकेकडे वर्ग करता येईल का याबाबतही विचारविनिमय सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news