सोलापूर, पुढारी वृत्त्सेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा अर्ज भरण्याकरिता दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. यानंतर विद्यापीठातील सर्व संकुलात सावळा गोंधळ उडाला. सर्व संकुलात आणि लेखा विभागात अर्ज भरणेसाठी सकाळी 9 पासून विद्यार्थ्यांच्या लांब रांगा होत्या. दोन दिवसांची मुदत दिल्याने परगावच्या विद्यार्थांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणाले, परिक्षा अर्ज भरण्याची प्रक्रीया ही दोन दिवसात होत नसल्याने विद्यापीठाकडून मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.
सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयात व पदव्युत्तर अधिविभागांमध्ये दि. 24 डिसेंबर 2022 पर्यंत विनाविलंब शुल्क अर्ज भरता येणार आहे. दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत विलंब शुल्कासहित फॉर्म भरता येणार. तसेच इतर सर्व अभ्यासक्रमांच्या तृतीय ते पाचव्या वर्षांच्या विद्यार्थ्यांकरीता दि. 2 जानेवारी 2023 पर्यंत विनाविलंब परीक्षा अर्ज महाविद्यालय अधिविभागांमध्ये भरता येणार आहेत.
.हेही वाचा