अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी
Published on
Updated on

अक्कलकोट, पुढारी वृत्तसेवा :  अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक आज दिवसभरात समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले. अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबाल वृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला. पहाटे ४ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरेकेटींगची सोय करून, भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती.

पहाटे २ वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची काकडआरती झाली. नगरप्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे ३ ते ४ या वेळेत निघाली. देवस्थानचे वतीने पारंपरिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोचारात पार पडले, व नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतीबा मंडपात सकाळी ७ वाजता देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांचे हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने करण्यात आली.

सकाळी १०:३० वाजता देवस्थानची नैवेद्य आरती दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब यांचे हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात व भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला. हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेने दर्शन होण्याकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यानी प्ररिश्रम घेतले.

तत्पूर्वी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिनाच्या आदल्या दिवशी श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची सांगता, भजन सोहळा, धर्मसंकीर्तन सोहळ्याची सांगता करण्यात आली. भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला, इत्यादी भागातून ४८ भजनी मंडळांनी आपली भजनसेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली. धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली. पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्ता श्रीमती उज्वलाताई सरदेशमुख, भजनसेवा श्रीशैल गवंडी व धर्मसंकीर्तन सोहळा महेश इंगळे, ओंकार पाठक यांच्या अधिपत्याखाली पार पडले.

श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वला  सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, ॲड. प्रदीप झपके, विजय दास, गणेश दिवाणजी, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, महेश हिंडोळे, राजकुमार मसुती, यशवंत धोंगडे, शशिकांत लिम्बीतोटे, शिवशरण अचलेर, प्रशांत गुरव, प्रथमेश इंगळे, मंगेश फुटाणे, चंद्रकांत डांगे, नंदू जगदाळे, श्रीशैल गवंडी, संजय पाठक, संतोष देगावकर, स्वामीनाथ लोणारी, शंकरराव पवार, मल्लिनाथ बोधले, गिरीश पवार, संजय पवार, ऋषिकेश लोणारी, बाळासाहेब घाटगे, बंडोपंत घाटगे, सागर गोंडाळ, दीपक जरीपटके, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले आदीसह असंख्य स्वामी भक्त स्वामी दर्शनाप्रित्यर्थ उपस्थित होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news