सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापुरात जिल्हात क्रिप्टोकरन्सीच्या सीसीएच ॲपव्दारे नागरिकांची लूट होत आहे. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे शहरातील अनेक गुंतवणूकदारांनी या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एक नवीन ॲप सोलापूरात जाळं विस्तारत आहे. आरवायआय क्लाउड असे ॲपचे नाव असून दामदुप्पट योजने खाली पैशांची गुंतवणूक करण्यात येत आहे.
सोलापूर शहरातील नागरिक, डॉक्टर, वकील, पोलीस, व्यपारी तसेच विविध व्यावसायिक या दामदुप्पट योजनेत पैस गुंतवले होते. बायनास या डॉलर बदलून मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेतुन बदलून घेत होते. सीसीएच ॲपमध्ये मोठी रक्कम जमा होताच ॲपची लिंक व वेबसाईट 5 ते 6 ऑक्टोबर पासून बंद झाली. सोलापुरातील अनेक जणांनी रक्कम सीसीएच ॲपमधून लंपास झाली. याबाबत पोलीसांत तिन एजंट विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.
कोट्यवधी रुपयांचा चुना लावून सीसीएच ॲपचे एजंट फरार झाले आहे. याचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे आरवायआय क्लाउड ॲप माध्यमातून याची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे. गुंतवणूक केल्यानंतर दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवण्यात येत आहेत. झटपट पैसे कमवण्याच्या नादात मोठी जोखीम घेऊन सोलापुरातील नागरिक यामध्ये गुंतवणूक करत आहेत.
नागरिकांनी ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक करणे टाळावे व कोणत्याही परिस्थितीत आपल्या बँक खात्यासंबंधी कसलीच माहिती ॲप अथवा कोणालाही देऊ नये. एखाद्या अनोळखी नंबर वरून कॉल अथवा मेसेज आल्यास लिंक ओपन करू नये. सतत मेसेजेस अथवा कॉल येत असल्यास तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा