Ashadhi Wari Palkhi | दुसर्‍या गोल रिंगण सोहळ्यासाठी खुडूस फाटा सज्ज

Sant Dnyaneshwar Palkhi | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; प्रशासनाकडून जोरदार तयारी
Ashadhi Wari Palkhi
पानीव : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील भाविकांचा ओघ वाढत असताना, खुडूस -पानीव फाटा उद्या माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

विनोद बाबर

पानीव : खुडूस फाटा (पानीव फाटा), ता. माळशिरस येथे उद्या बुधवार दि. 2 जुलै रोजी सकाळी 8 वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण रंगणार आहे. या पवित्र व ऐतिहासिक सोहळ्याच्या स्वागतासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत व विविध संस्था एकत्र येत जय्यत तयारीला लागल्या आहेत.

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन यंदाही ज्योतीराम वाघ व जयवंत सिद यांच्या शेतजमिनीवर होणार आहे. संपूर्ण पंचक्रोशीतील भाविकांच्या नजरा या सोहळ्याकडे लागल्या आहेत. भक्तिभावात न्हालेला हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

Ashadhi Wari Palkhi
Sant Muktai Palkhi : संत मुक्ताई पालखीचे भूममध्ये स्वागत; हजारोंची उपस्थिती

खुडूस ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सोहळ्याच्या सर्व तयारीस सुरुवात झाली आहे. स्वागत कमानी, स्वयंसेवक नियुक्ती, दिवाबत्ती, फॉगिंग मशिनद्वारे औषध फवारणी, नाले व परिसर स्वच्छता, स्ट्रीट लाईट दुरुस्ती, अशा विविध कामांवर भर देण्यात आला आहे. रिंगणाचा परिसर सुरेखपणे विकसित करण्यात आला आहे. भाविकांना व्यवस्थित दर्शन व सोहळा अनुभवता यावा, यासाठी विशेष नियोजन केले आहे.

Ashadhi Wari Palkhi
Shri Sant Eknath Maharaj Palkhi : पालखी मुक्कामासाठी खर्डा भुईकोट किल्ल्याच्या पायथ्याशी

सोहळ्याच्या दिवशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून भोजनाची मेजवानी देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी-कर्मचारी, युवक मंडळे, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ या सर्वांनी मिळून हा सोहळा भव्य, दिव्य आणि यशस्वी करण्यासाठी योगदान दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news