Akluj Annadan News
अकलूज : सराटी मार्गावर वैष्णवांना भाकरी, पिठल्याचे वाटप करताना सयाजीराजे मोहिते -पाटील व विद्यार्थी.(Pudhari File Photo)

Akluj Annadan News | भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

Palkhi | अकलूज येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने पालखी सोहळ्यातील वैष्णवांना अन्नदान
Published on

अकलूज : अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे 31 हजार भाकरी व 135 किलो बेसनाचे पिठले, ठेचा, लोणचे, कांदा अशा अस्सल ग्रामीण अन्नदान वाटपाचा प्रारंभ युवा नेते सयाजीराजे मोहिते -पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते -पाटील, ऋतुजादेवी मोहिते -पाटील, कृष्णप्रिया मोहिते -पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे -पाटील प्रमुख उपस्थित होते. या उपक्रमात संस्थेच्या 10 शाखेतून 11 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

image-fallback
अकलूज येथे रेमडेसिवीरचा काळा बाजार; तिघे गजाआड

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज दि. 1 जुलै रोजी अकलूज येथे आगमन होत आहे. पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी(जि.पूणे) येथे होता. सराटी व अकलूज हे अंतर केवळ 3 कि.मी. आहे. तसेच अकलूज येथे मुक्कामाच्या मोठ्या सुविधा असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येतात. आदल्या दिवशीही वैष्णवांनाही अन्नदान व्हावे. त्यांना घरगुती भोजनाचा आस्वाद मिळावा. या हेतूने जयसिंह मोहिते -पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने सन 2015 पासून अन्नदानाला सुरुवात केली आहे. तीच परंपरा संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील, सदस्या स्वरूपाराणी मोहिते -पाटील, युवा नेते सयाजीराजे मोहिते -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सुरु आहे. अन्नदान वाटपाचे हे 11 वे वर्ष आहे.

Akluj Annadan News
Solapur News | शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांचा होणार फायदा

अकलूज सराटी महामार्गावरील अन्नदानात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर, जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते -पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूज या 6 शाखेतून सुमारे 9 हजार विद्याथ्यार्ंचा सहभाग होता. येथे 21 हजार भाकरी, 70 किलो बेसन पिठलं, ठेचा, लोणचं, कांदा असे ग्रामीण भोजनाचा बेत होता.

यावेळी मुख्याध्यापक संजय गळीतकर, अमोल फुले, मुख्याध्यापिका सुनीता वाघ, प्रा. राहुल सुर्वे, शिवाजी पारसे, अनिता पवार, विजय निंबाळकर, नामदेव कुंभार उपस्थित होते.

1 हजार 250 विद्यार्थ्यांचा सहभाग

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी संस्थेच्या सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज यांच्यावतीने मांडवे (ओढा) विसावा येथे दि. 1 जूलै रोजी 5 हजार 500 भाकरी व 35 किलो बेसनाचे पिठले, ठेचा, लोणचे असे अन्नदान होत आहे. यामध्ये सुमारे 1 हजार 250 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. तर वेळापूर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील विद्यालय, प्राथमिक, माध्यमिक व अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय वेळापूर यांच्यावतीने दि.2 जूलै रोजी वेळापूर येथे 4 हजार 500 भाकरी, 30 किलो बेसनाचे पिठले, ठेचा, लोणचे असे अन्नदान होत आहे. यामध्ये 1 हजार विद्यार्थी सहभागी होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news