नीट प्रकरणातील शिक्षक जाधव निलंबित

गैरप्रकारचा ठपका; जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाई
Teacher Jadhav suspended in Neet case
नीट प्रकरणी प्रशासनाने शिक्षक जाधव यास निलंबित केले आहे.Pudhari File Photo
Published on
Updated on

सोलापूर : नीट पेपरफुटीतील संशयित शिक्षक संजय जाधव याच्या अटकेचा अहवाल लातूर पोलिसांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. शिक्षण विभागाने हा अहवाल प्रशासन विभागाकडे पाठविला. त्या अहवालावरून प्रशासनाने शिक्षक जाधव यास निलंबित केले आहे.

Teacher Jadhav suspended in Neet case
पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना झटका

शिक्षक जाधव यास लातूर पोलिसांनी केली अटक

सध्या देशासह राज्यात नीट पेपरफुटी प्रकरण गाजत आहे. त्याचे लोण सोलापूर जिल्ह्यात आले आहे. माढा तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जाधव यास लातूर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक शिक्षण विभागास बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अहवाल पाठविला. त्या अहवालाची तपासणी गुरुवारी (दि. 27) शिक्षण विभागाकडून करण्यात आली. त्यानंतर तो अहवाल जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी शिक्षक जाधव यास निलंबित केले आहे.

Teacher Jadhav suspended in Neet case
दूध दरासाठी शेतकरी आक्रमक; उद्यापासून राज्यभर आंदोलन

जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाई

जिल्हा परिषद शिक्षक जाधव याने पैशाच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना अवैध मदत करुन गैरप्रकार करुन फसवूणक केली. त्यामुळे त्या शिक्षकाला कलम 420/120 भारतीय दंड संहितेनुसार अटक करुन त्याच्या गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती लातूर पोलीसांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागास कळविली. त्यामुळे त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

Teacher Jadhav suspended in Neet case
भारतात शिक्षा, परदेशी सन्मान : अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्कार जाहीर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news