पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना झटका

शिक्षेला स्‍थगिती देण्‍याची मागणी करणारी याचिका फेटाळली
Imran Khan
इम्रान खान File Photo

पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्‍यायालयाने आज (दि.२७) आणखी एक झटका दिला आहे. बेकायदेशीर निकाह प्रकरणातील शिक्षेला स्‍थगिती मिळावी, अशी मागणी करणारी त्‍यांची याचिका न्‍यायालयाने फेटाळली आहे.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्‍या आदियाला कारागृहात विविध प्रकरणी शिक्षा भोगत आहेत. बेकायदेशीर निकाह प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी झाली आणि सुनावणीदरम्यान न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांची शिक्षा स्थगित द्‍यावी, अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

Imran Khan
‘माझ्‍या पत्‍नीला तुरुंगात काही झालं तर…’ : इम्रान खान यांची लष्‍कर प्रमुखांना धमकी

बेकायदेशीर निकाह प्रकरणी न्‍यायालयाने सुनावणी हाेती सात वर्षांची शिक्षा

बुशरा बीबी आणि इम्रान खान यांचा निकाह बेकायदेशीर असल्‍याची तक्रार बुशरा यांचा माजी पती खवर मनेका यांनी केली होती. यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये बुशरा बीबी यांच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल झाला होता.इम्रान खान यांनी प्रतीक्षा कालावधीचे पालन न करता बुशेरा बीबीशी लग्न केले, असा आरोप होता. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली. 3 फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणी इम्रान खान व त्‍यांच्‍या पत्‍नी बुशरा बीबी यांना सात वर्षांच्या तुरुंगवासासह 5,00,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

Imran Khan
पाकिस्‍तान लष्‍कराकडून माझ्‍या पत्‍नीवर विषप्रयोग : इम्रान खान यांचा खळबळजनक आरोप

या शिक्षेला आव्‍हान देणारी याचिका इम्रान खान यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायालयात दाखल केली होती. न्यायाधीश एडीएसजे अफजल माळोका यांनी मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी करून निर्णय राखून ठेवला होता. यानंतर आज ( दि.२७) इम्रान खान यांची याचिका फेटाळून लावली. इम्रान खान आणि बुशरा बीबी यांचा निकाह २०१८ मध्‍ये झाला होता. या वर्षी इम्रान खान यांची पंतप्रधानपदी नियुक्‍ती झाली होती. बुशरा बीबी ही इम्रान खानची तिसरी पत्नी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news