सोलापूर; नितीन नगरातील सारडा यंत्रमाग कारखान्याला आग

सोलापूर; नितीन नगरातील सारडा यंत्रमाग कारखान्याला आग

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी भागातील नितीन नगर येथील सारडा यंत्रमाग कारखान्याला आग लागली. या आगीच्या कारखान्याचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ११) रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवित हानी झालेली नाही. अग्निशामक दलाच्या २० गाड्यांना सकाळी सहाच्या सुमारास आग विझविण्यास यश आले.

एमआयडीसी परिसरातील नितीन नगरात सुनिल सारडा व ज्योती सारडा यांचा सारडा टेक्स्टाईल हा पत्रा शेडमध्ये यंत्रमाग कारखाना आहे. गुरुवारी रात्री या कारखान्यात काही कामगार हे मशिनरीवर टॉवेलचे काम करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास कारखान्यातील सर्व कामगार कारखान्याबाहेर चहा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी अचानकपणे कारखान्यातील वायरींगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. कारखान्यात सुत व सुताचे बंडल असल्यामुळे आगीने लगेच रौद्र रूप धारण केले. यानंतर कामगारांनी तोबोडतोब कारखान्याचे मालक सारडा यांना फोनवरून घटनेची माहिती दिली.

यानंतर मध्यरात्री अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिक्षक केदारनाथ आवटे यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात होते. याच दरम्यान कारखान्यामध्ये लूमवर सूत व सूताच्या गाठी असल्यामुळे ही आग भडकत होती. आग विझविण्यासाठी कारखान्याचे कामगार, अग्निशामक दलाचे जवान, पोलिस हे कार्यरत होते.

यानंतर अथक प्रयत्नानंतर पहाटे सकाळी सहाच्या सुमारास अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले आहे. या आगीमध्ये कारखान्यातील १२ लूम, मशिनरी, यार्न, तयार कच्चा व पक्‍का माल, वायरींग, ४ रॅपर लूम, ३ वॉरपिंग मशीन अशा सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ( सारडा यंत्रमाग कारखान्याला आग )

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news