धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट | पुढारी

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा उमेदवारीवरून नाराज असलेले भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बुधवारी रात्री अचानक मुंबई गाठत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली.

या दोन नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याचे समजते. यावरून धैर्यशील आता कमळ सोडून तुतारी हातात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धैर्यशील मोहिते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू होती. इतकेच नाही तर माढा लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार असल्याच्या चर्चाही रंगत होत्या. येत्या 13 तारखेला धैर्यशील मोहिते-पाटील यांचा वाढदिवस आहे. दरम्यान, शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केल्यास ते आपल्या वाढदिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

Back to top button