सोलापूर : गुळवंचीजवळ कार-दुचाकीच्या अपघातात तरुण ठार; दोघे जखमी

सोलापूर : गुळवंचीजवळ कार-दुचाकीच्या अपघातात तरुण ठार; दोघे जखमी

उत्तर सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथील एचपी पेट्रोल पंपासमोर शनिवारी रात्री कार व दुचाकीची जोरात धडक होऊन दुचाकीवरील महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाले.

या अपघाताबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, लोकमंगल कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारे अंशुल प्रकाश राठोड (वय २०, रा. गांधीनगर आसरा, सोलापूर), श्रीकांत सिद्राम कोरे (रा.नान्नज ता. उत्तर सोलापूर), सुयश तंटक (रा.परंडा ) तिघे मित्र सोलापूर येथे कामानिमित्त गेले होते. बाळे येथून शनिवारी रात्री साडेनऊ दहा वाजण्याच्या सुमारास तिघे दुचाकीवरून (एम.एच-१३ एके १३७५) लोकमंगल महाविद्यालयाकडे येत होते. यावेळी गुळवंची जवळील एचके पेट्रोल पंपासमोर कार (एम.एच १३ एसी-८५४९) आणि दुचाकीच्या धडकेत अंशुल राठोड याच्या डोक्यास व छातीस जबर मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

अंशुल हा लोकमंगल कृषी महाविद्यालयात ॲग्री बिझनेस टेक्नॉलॉजीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तर श्रीकांत कोरे व सुयश तंटक हे जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून पुढील तपास उत्तर तालुका पोलीस करत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पत्रा फाटून रक्ताचा सडा पडला आहे. तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news