सोलापूर : ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरती रखडली | पुढारी

सोलापूर : ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरती रखडली

सोलापूर; पुढारी वृत्तेसवा : राज्यातील ग्रामसेवक, आरोग्य सेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला. अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो उमेदवार परीक्षेची वाट पाहत आहेत. तातडीने परीक्षा घ्यावी, अशी मागणी शासनाकडे करत आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्याआधी ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरती परीक्षा घेऊन करण्याची मागणी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75 हजार शासकीय नोकर्‍यांची घोषणा केली होती. त्यानुसार काही विभागांत पदभरती राबविण्यात आली. त्यानुसारच भरती प्रक्रिया सुरूच आहे. अर्ज भरून तीन महिने लोटले आहेत. पण, परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही.

Back to top button