धक्कादायक! सोलापुरात मराठा आरक्षणाला विरोध केल्याने तरूणाच्या अंगावर ऑईल टाकून मारहाण | पुढारी

धक्कादायक! सोलापुरात मराठा आरक्षणाला विरोध केल्याने तरूणाच्या अंगावर ऑईल टाकून मारहाण

सोलापूर; पुढारी वृत्तसंस्था : मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचा आरोप करत सोलापुरात एका तरुणाला मराठा कार्यकर्त्यांनी अंगावर ऑईल टाकून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रताप कांचन याच्या फिर्यादीवरून ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम जाधव, योगेश पवार, रतिकांत पाटील, ओंकार लोखंडे, किरण वाघमारे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संबंधित बातम्या : 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सोलापुरात मराठा आंदोलकांनी प्रताप कांचन या तरुणास ओबीसी मधून आरक्षण देण्यास तुझा विरोध का? अशा पद्धतीने जाब विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रताप कांचनच्या डोक्यावर ऑइल ओतले. तसेच त्याला मारहाण केली. आंदोलक तरुणांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले, अशी फिर्याद प्रताप कांचन याने दिली आहे. याप्रकरणी सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज जरांगेचे मराठा नेत्यांना आवाहन

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मराठा नेत्यांना आवाहन केले आहे. मराठा समाजातील मुलांच्या विरोधात सुरु असलेल षडयंत्र हाणून पाडण्यासाठी एकत्र आले पाहिजे. मराठा समाजाने उद्या म्हणायला नको अगोदर आम्हाला का सांगितले नाही म्हणून मी आजच सांगत आहे. जात संपवू देऊ नका मराठ्याच्या मुलांसोबत उभे रहा. हीच योग्य वेळ असून, एकत्र आला नाही तर मराठा समाज कधीच माफ करणार नाही, असे आवाहन जरांगे यांनी मराठा नेत्यांना केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button