सोलापूर ग्रामपंचायत निवडणूक : टेंभुर्णीत दोन ठिकाणी मशीनमध्ये बिघाड | पुढारी

सोलापूर ग्रामपंचायत निवडणूक : टेंभुर्णीत दोन ठिकाणी मशीनमध्ये बिघाड

टेंभुर्णी ; पुढारी वृत्‍तसेवा टेंभुर्णीत मतदान सुरू असताना दोन ठिकाणी इलेक्‍ट्रानिक मशीन बंद पडल्याने मतदानाचा दोन-तीन तास खोळंबा झाला. यामुळे काही मतदार मतदान न करताच घरी परतले. यामुळे मतदाते, उमेदवार व कार्यकर्ते प्रक्षुब्ध झाले.

आज (रविवार) सकाळ पासून टेंभुर्णी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू आहे. वार्ड क्रमांक एक मधील मतदारांसाठी जनता विद्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे खोली क्र.३ मधील मशीन मतदान सुरू झाले असताना बंद पडली. यानंतर दुसरी मशीन मागविण्यात आली. ती ही चालू झाली नाही. तसेच वार्ड क्रमांक दोन मधील मतदारांसाठी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील खोली क्रमांक दोन मधील मशीन सकाळ पासून बंद पडली होती. काही केल्याने ती सुरू होत नव्हती. मशीन सुरू व्हावी यासाठी तब्बल ९-१० मशीन बदलल्या नंतर मतदान सुरळीत सुरू झाले.

मशीन बंद पडल्याने एकच गोंधळ सुरू झाला. यामुळे मतदांरामध्ये प्रशासना विषयी तीव्र नाराजी पसरली. योग्य पद्धतीने कार्य करणाऱ्या मशीन का येत नाहीत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मशीन सुरू होण्यास वेळ होत असल्याने अनेक मतदार मतदान न करताच निघून गेले. याचा फटका उमेदवारांना बसतो की काय अशी चर्चा करण्यात येत होती. मशीन बंद पडल्यामुळे व मतदार गोंधळ करू लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये ही नाराजीचा सुरू निघत होता. या ठिकाणी मतदान सुरळीत व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विशाल गायकवाड, केंद्र अधिक्षक तानाजी काकडे यांनी कसोसीने प्रयत्न केले.

हेही वाचा :

Back to top button