Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी सोलापुरात तीव्र आंदोलन; ५०० गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी | पुढारी

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी सोलापुरात तीव्र आंदोलन; ५०० गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात मराठा समाजाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच त्यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मराठा समाजाकडून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील सुमारे ५०० गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. (Maratha Aarakshan)

आज सकाळी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्‍हे गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे व अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून आंदोलन करण्यात आले. तर कारंबा या गावात १०० मराठा युवकांनी मुंडण आंदोलन केले. यावेळी युवकांनी डोक्यावरचे केस कापून सरकारचा जाहिर निषेध केला. कोंडी गावात ग्रामस्थांकडून शनिवारपासून अन्नत्याग करून आमरण उपोषण केले जात आहे. आज सकाळी गावातील तरूणांनी डोक्यावरचे केस काढून मुंडण आंदोलन करीत सरकारच्या वृत्तीचा जाहिर निषेध व्यक्त केला आहे.  (Maratha Aarakshan)

हेही वाचा :

Back to top button