Solapur Guardian Minister : भाजपमधील कुरबुरींचे चंद्रकांत पाटलांपुढे आव्हान | पुढारी

Solapur Guardian Minister : भाजपमधील कुरबुरींचे चंद्रकांत पाटलांपुढे आव्हान

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा- राज्य सरकारने आज पालकमंत्र्यांची नव्याने यादी जाहीर केली आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेले आहे. पाटील हे यापूर्वी पुण्याचे पालकमंत्री होते. (Solapur Guardian Minister) आता पुण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली आहे. पाटील यांना सोलापूर भाजपमधील कुरबुरी रोखण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. (Solapur Guardian Minister)

संबंधित बातम्या –

पाटील हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्यामुळे त्यांचा थेट सोलापूरशी संबंध होता. याठिकाणचे राजकारण नेमके काय आहे, याची जाणीव पाटील यांना आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांचा सहभाग झाल्यानंतर पालकमंत्री बदलीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. या विषयावरुन उपमुख्यमंत्री पवार हे नाराज असल्याच्या चर्चाही सुरु होत्या. मात्र, आता पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्यामुळे सर्व काही अलबेल होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे गट कार्यरत आहेत. याशिवाय खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यामध्येही फारसे सख्य नाही. जिल्ह्यातील ही राजकीय परिस्थिती हाताळण्यात नवे पालकमंत्री पाटील हे कितपत यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विखेंना मिळाला दिलासा

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. त्यावेळी त्यांना जिल्ह्याला योग्य तो न्याय देता येत नव्हता. त्यांच्याकडे त्यांच्या नगर जिल्ह्याचीही जबाबदारी होती. त्यामुळे त्यांची अडचण होत होती. पण, आता त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी दिल्यामुळे त्यांच्याकडून जिल्ह्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Back to top button