‘Delhi Haat’ Mango Exhibition: दत्तात्रय घाडगे यांनी पिकविलेला ‘शरद’ आंबा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू | पुढारी

'Delhi Haat' Mango Exhibition: दत्तात्रय घाडगे यांनी पिकविलेला 'शरद' आंबा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्ली टूरिझमच्या वतीने जनकपुरी ‘दिल्ली हाट’ मध्ये 32 व्या आंबा प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात सांगलीच्या दत्तात्रय घाडगे यांनी सोलापूर जिल्ह्यातील आपल्या आरण या मूळ गावी पिकविलेला शरद जातीचा आंबा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. (‘Delhi Haat’ Mango Exhibition)
आंबा प्रदर्शनात देशभरातील आंब्याच्या शेकडो जाती मांडण्यात आलेल्या आहेत. त्यात केशर, चौसा, लंगडा, सफेदा, मालदा, फरजी, आम्रपाली, मल्लिका या जातींचा समावेश आहे. घाडगे हे प्रदर्शनात सामील असलेले एकमेव महाराष्ट्रीयन आहेत. माढा तालुक्यातील आरण या गावी त्यांनी आठ एकरवर क्षेत्रावर आंब्याची बाग लावली आहे. 2018 साली त्यांनी कलमे लावली होती. त्यांच्या बागेत तब्बल सात हजार झाडे आहेत. (‘Delhi Haat’ Mango Exhibition)
शरद जातीच्या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या एका आंब्याचे वजन अडीच ते तीन किलोपर्यंत भरते. दिसावयास पिवळा धमक आणि भरपूर गर यामुळे हा आंबा लोकप्रिय ठरला असून दिल्लीकरांना या आंब्याची भुरळ पडली आहे. तीन दिवस भरलेल्या दिल्लीतील आंबा प्रदर्शनात अनेकांनी या आंब्याला पसंती दर्शवित घाडगे यांच्या मेहनतीचे कौतुक केले.

हेही वाचा

Back to top button