सोलापूर जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन | पुढारी

सोलापूर जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबईच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यातील काही भागात येत्या 2 व 3 जून रोजी उष्णतेच्या लाटेसम स्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

गेल्या काही दिवसापासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील तपमान सातत्याने कमी जास्त होत आहे. तर गुरुवारी दिवसभरात ४२.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे गरजेशिवाय उन्हात जास्त फिरू नये. उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी तयारी करूनच घराबाहेर पडावे. डोक्यावर टोपी घालावी किंवा सुती कपडा गुंडाळावा. सोबत पाणी, लिंबू पाणी किंवा ओआरएस ठेवावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिका-यांनी केले आहे.

.हेही वाचा 

आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सावधान! ‘जॉब टास्क फ्रॉड’ करू शकतो कंगाल! सायबर चोरट्यांचा 53 जणांना 3 कोटी 80 लाखांचा गंडा

नगर: अग्निशमन विभागाला मिळणार बळ, पंधरा दिवसांत 40 कर्मचारी, नवीन बंबही होणार दाखल

Back to top button