सोलापूर विद्यापीठामधील बँकिंग क्षेत्रासाठीमध्ये ३२ विद्यार्थ्यांची निवड | पुढारी

सोलापूर विद्यापीठामधील बँकिंग क्षेत्रासाठीमध्ये ३२ विद्यार्थ्यांची निवड

सोलापूर, रोहीत हेगडे : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत वाणिज्य व व्यवस्थापन संकुल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल बँकिंग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधीकरिता प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला. कोरोनानंतर पहिल्‍यांदाच विद्यापीठमध्ये हा कॅम्पस घेण्यात आला. या ड्राईव्हमध्ये जवळपास 32 विद्यार्थ्यांची निवड ही झाली आहे.

सदर प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वीपणे करण्याकरीता संकुलाच्या संचालक तथा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. तर या ड्राईव्हचे प्लेसमेंट ऑफिसर डॉ. महानंदा बनसोडे यांनी पाहीले. या ड्राईव्हकरीता स्वेरी कॉलेज पंढरपूर, सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध संकुले, तसेच दयानंद महाविद्यालय, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, वि.गु.शिवदारे महाविद्यालय, के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिटयूट, लोकमंगल महाविद्यालयातून 124 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या.

दरम्‍यान, 124 विद्यार्थ्यांमधून 32 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना बँकिंग ऑपरेशन्स, बँकिंग सेवा विक्री तसेच बँकिंग प्रशासन आदी क्षेत्रांमध्ये संधी मिळणार आहे. या ड्राईव्हच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल बँकिंगचे डायरेक्टर विवेक राजमाने, त्यांचे सहकारी प्रणव कापसे यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले.

.हेही वाचा   

सोलापूर विद्यापीठात वाणिज्य व व्यवस्थापन विषयावर नेट-सेट कार्यशाळा

Solapur : शासकीय पॉलिटेक्निकच्या इमारतींची दुरवस्था 

Solapur : आवाज करू नको, नाहीतर गोळ्या घालीन

 

Back to top button