सोलापूर जिल्ह्यात ३ हजार ४६९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अवकाळीचा फटका

सोलापूर ; महेश पांढरे सोलापूर शहर व जिल्ह्यात काल (शनिवार) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. यावेळी झालेल्या गारपीठ आणि वादळी वार्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 104 गावातील 4 हजार 769 शेतकर्यांच्या 3 हजार 469 हेक्टर फळबागा आणि शेती पीकांचचे 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकर्यांनी केली आहे. तर शासकीय कर्मचारी संपावर असल्याने या पंचनाम्यासाठी आता डचणी निर्माण झाल्या आहेत.
शनिवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यताील 38 गावातील 819 शेतकर्यांच्या 321 हेक्टरवरील पपई, केळी, द्राक्षे, आंबा, ज्वारी, गहू या पीकांना फटका बसला आहे. तर बार्शी तालुक्यातील चार गावातील 236 शेतकर्यांच्या 180 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, हरभरा, द्राक्ष, कलिंगड आणि कांदा पिकाला तडाखा बसला आहे. करमाळा तालुक्यातील 12 गावातील 309 शेतकर्यांच्या 216 हेक्टर क्षेत्रावरील केळी, द्राक्षे, गहू आणि कांदा पीकांचे नुकसान झाले आहे. तर माळशिरस तालुक्यातील 28 गावातील 730 शेतकर्यांच्या 625 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी आणि गव्हाच्या पीकांची नासाडी झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील 3 गावातील 67 शेतकर्यांच्या 136 हेक्टर वरील द्राक्ष आणि गव्हाच्या पीकांचे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील 9 गावातील 76 शेतकर्यांच्या 58 हेक्टर क्षेत्रावरील पपई, केळी, द्राक्षे, आंबा, ज्वारी आणि गव्हाच्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील 6 गावातील 2 हजार 400 शेतकर्यांच्या 1 हजार 850 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, पेरु, पपई, डाळींब, भाजीपाला आणि गव्हाच्या पीकांचे नुकसान झाले आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील 4 गावातील 132 शेतकर्यांच्या 83 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी आणि गव्हाच्या पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पीकांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकर्यांनी लावून धरली आहे.
जिल्ह्यातील 404 शेतकर्यांचे 290 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्के पेक्षा कमी नुकसान
शनिवारी झालेल्या अवकाळी आणि गारपीठीच्या पावसामध्ये जिल्हयातील आठ तालुक्यातील 104 गावातील 404 शेतकर्यांच्या 290 हेक्टर क्षेत्रावारील विविध पीकांचे 33 टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले आहे. तर 4 हजार 769 शेतकर्यांच्या 3 हजार 469 शेतकर्यांचे 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तसा अंदाजे अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठविला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
विविध 8 तालुक्यातील 104 गावातील पीकांना मोठा फटका
सोलापूर जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी, वागदरी, तडवळ, कडबगाव, गौडगाव, हंजगी, दोड्याळ, किणीवाडी,काझीकणबस, शिरशी, शिरवळ, सदलापूर, कीणी, पालापूर, तोरणी, भोसगे, संगोगी, सलगर, गौडगाव, बिजनेर, बबलाद, बोरोटी, जकापूर, उडगी, तोळणुर, जेऊर, जैनापुर, करजगी, हंद्राळ, नावींदगी, नागणसूर, हैद्रा, गुरववाडी, मराठवाडी, हिळ्ळी, आंदेवाडी, शावळ, कलहिप्परगे तर बार्शी तालुक्यातील पांढरी, ढेबरेवाडी, चिंचोली, घोळवेवाडी, करमाळा तालुक्यातील केम, वडशिंगे, पांगरे, जिंती, कुंभारगाव, भगतवाडी, पारेवाडी, रामवाडी, वाशिंबे, वांगी, माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर, गोरडवाडी, मांडकी, कन्हेर, भांब, रेडे, गिरवी, तरंगफळ, मोटेवाडी, जळभावी, फडतरी, खुडूस, निमगाव, झंजेवाडी, डोंबाळवाडी, वेळापूर, दसूर, भांबुर्डी, कोथळे, कारुंडे, बोंडले, तोंडले, शेंडेचिंच, मळोली, धानोरे, उघडेवाडी, पिसेवाडी, तर मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी मोहोळ तालुक्यातील अर्धनारी, घोडेश्वर, अरबळी, खुनेश्वर, येणकी, इंचगाव, वडदेगाव, हिंगणी, भोयरे तर पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर, मुंढेवाडी, कोडारकी, टाकळी, चळे आणि पंढरपूर परिसरातही नुकसान झाले आहे तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ, कणबस,इंगळगी अणि बोरुळ भागात मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा :
- Weather Warning: उत्तर, ईशान्य भारतासह ‘या’ राज्यात २२ मार्चपर्यंत अवकाळीचा इशारा
- North Korea : ‘अमेरिकेशी युद्धासाठी आमचे आठ लाख नागरिक सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक’; उत्तर कोरियाचा दावा
- कोकणातील जनता ठाकरेंसोबतच; ५ मार्चला उद्धव ठाकरेंच्या सभेने चित्र स्पष्ट झालंय : संजय राऊत