North Korea : 'अमेरिकेशी युद्धासाठी आमचे आठ लाख नागरिक सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक'; उत्तर कोरियाचा दावा | पुढारी

North Korea : 'अमेरिकेशी युद्धासाठी आमचे आठ लाख नागरिक सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक'; उत्तर कोरियाचा दावा

पुढारी ऑनलाइन डेस्क : North Korea : ‘उत्तर कोरियाने दावा केला आहे की युएस विरुद्द लढण्यासाठी आमचे आठ लाख नागरिक राष्ट्रीय सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक आहेत. किंवा स्वेच्छेन पुन्हा नोंदणी करू इच्छितात. उत्तर कोरियाचे राज्य वृत्तपत्र ‘रोडॉन्ग सिनमुन’च्या हवाल्याने सीएनएनने याचे वृत्त दिले आहे. सिनमुनमध्ये म्हटेल आहे की, शुक्रवारी देशभरातील सुमारे 800,000 विद्यार्थी आणि कामगारांनी युनायटेड स्टेट्सचा मुकाबला करण्यासाठी सैन्यात भरती होण्याची किंवा पुन्हा भरती होण्याची इच्छा व्यक्त केली.

(North Korea) ‘उत्तर कोरियाने गुरुवारी सुरू असलेल्या यूएस-दक्षिण कोरिया लष्करी कवायतींना प्रत्युत्तर म्हणून आपले ह्वासोंग-17 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) सोडले. त्यानंतर हा दावा करण्यात आला आहे. याशिवाय गुरुवारी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष अण्वस्त्र सज्ज उत्तर कोरियाचा कसा प्रतिकार करावा, यावर चर्चा करण्यासाठी आयोजित शिखर परिषदेसाठी टोकियोला जाण्यापूर्वी काही तास आधी उत्तर कोरियाने कोरियन द्वीपकल्प आणि जपान दरम्यानच्या समुद्रात ICBM गोळीबार केला.

(North Korea) उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्यांना तोंड देण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकन सैन्याने सोमवारी “फ्रीडम शील्ड 23” या नावाने 11 दिवसांच्या संयुक्त कवायती सुरू केल्या, ज्या 2017 पासून न पाहिलेल्या प्रमाणात आयोजित केल्या गेल्या.
त्यामुळे (North Korea) उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरियावर लष्करी कवायतींमुळे तणाव वाढल्याचा आरोप केला आहे. तसेच उत्तर कोरियाने अनेक वेळा युद्धाच्या धमक्या देऊन यूएसला प्रक्षोभित करतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या आठवड्यात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल आणि जपानचे नेते फुमियो किशिदा यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आणि भेटीव्यतिरिक्त पुढील महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये यून आणि त्यांच्या पत्नीच्या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील घनिष्ठ संबंधांना अधोरेखित करणारी ही बिडेन यांच्या अध्यक्षतेची दुसरी राज्य भेट असेल आणि 26 एप्रिल रोजी होईल. पुराणमतवादी यून आणि त्यांच्या प्रशासनाने यूएस-दक्षिण कोरिया युती मजबूत करणे हे प्रमुख परराष्ट्र धोरण प्राधान्य दिले आहे.

हे ही वाचा :

पुणे : गुढीपाडव्यानंतरच मिळणार आनंदाचा शिधा

Tamilnadu : लॉरीला मिनी व्हॅनची धडक; सहा ठार, तीन जखमी

Back to top button