सोलापूर : करमाळ्यातील शेतकऱ्याच्या मुलाचा पराक्रम, बनवली सौर उर्जेवर चालणारी बोट | पुढारी

सोलापूर : करमाळ्यातील शेतकऱ्याच्या मुलाचा पराक्रम, बनवली सौर उर्जेवर चालणारी बोट

जेऊर; गणेश चव्हाण : करमाळा तालुक्यातील भिवरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील श्रीहरी जाधव या उच्चशिक्षित तरुणाने सौरऊर्जेवर चालणारी बोट बनवली आहे. या बोटीने प्रवास यशस्वी केल्याने श्रीहरी जाधव यांचे करमाळा तालुक्यात कौतुक केले जात आहे.

करमाळा तालुक्यातील भिवरवाडी, ढोकरी, बिटरगाव, वांगी, शेलगाव, सांगवी या परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामासाठी तसेच वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी इंदापूरला जावे लागते. यासाठी टेंभुर्णी मार्गे 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. 2019 मध्ये डिझेल इंजिनवरील बोट सेवा बंद पडली होती. यावर पर्याय म्हणून श्रीहरी जाधव यांनी सौरऊर्जेवरील सर्व साहित्य आणून स्वतः सौरऊर्जेवर चालणारी बोट तयार केली आहे. या बोटीच्या माध्यमातून ढोकरी (करमाळा) ते शहा (इंदापूर) या गावादरम्यान जे-जा करण्यासाठी बोटीने यशस्वी प्रवास केला आहे. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ खुश आहेत.

हेही वाचा;

Back to top button