पुणे : उपचारासाठी आलेल्या रुग्णाची सरकारी डॉक्टरला मारहाण; चांडोली ग्रामीण रुग्णालयातील घटना | पुढारी

पुणे : उपचारासाठी आलेल्या रुग्णाची सरकारी डॉक्टरला मारहाण; चांडोली ग्रामीण रुग्णालयातील घटना

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा : उपचारासाठी आलेल्या रुग्णाकडून सरकारी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना रविवारी (दि. १२) चांडोली ग्रामीण रुग्णालयात घडली. वैद्यकिय अधिकारी प्रविणकुमार पांडूरंग इंगळे यांनी रुग्ण हनुमंत सोपान वाडेकर (रा. वाडेकर स्थळ शिरोली, ता. खेड) याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉक्टर प्रवीणकुमार इंगळे ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे वैद्यकीय अधिकारी म्हणुन शासकीय सेवेत कार्यरत आहेत. आरोपी हनुमंत वाडेकर याने कीटकनाशक औषध घेतले होते. त्यामुळे त्याला नातेवाईकांनी चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. डॉक्टर इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ वाडेकर याच्यावर उपचार सुरू केले होते. दरम्यान वाडेकर यांना उपचार करण्यास विरोध करून मोठमोठ्याने आरडाओरडा करुन “माझ्या अंगाला हात लावायचा नाही” असे म्हणून शिवीगाळ केली. डॉक्टर इंगळे यांच्या टी शर्टची कॉलर पकडून टी शर्ट फाडून कानशिलात मारल्या. सलाईन अडकविण्याच्या लोखंडी रॉड घेवून मारण्यासाठी डॉक्टर इंगळे यांच्या अंगावर धावून गेला. या घटनेबाबत रुग्ण वाडेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला असून खेड पोलीस तपास करत आहेत.

Back to top button