सोलापूर: मार्डीत सासुरवाडीला आलेल्या जावयाची कार पेटवली | पुढारी

सोलापूर: मार्डीत सासुरवाडीला आलेल्या जावयाची कार पेटवली

उत्तर सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथे सासरवाडीत आलेल्या जावयाची घराशेजारी मोकळ्या जागेत लावलेली कार अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. ही घटना मार्डी येथे घडली. याप्रकरणी कारचे मालक ज्ञानेश्वर भिमराव लिगाडे (वय ४६, रा. सांगोला, जि.सोलापूर) यांनी उत्तर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर लिगाडे कार (एमएच- ४५ ए क्यु-४०२५) घेऊन मार्डी येथील सासरे सुनिल श्रीमंत मुडके यांच्या घरी सहकुटुंब आले होते. बुधवारी तुळजापूर येथे देवदर्शन करून आल्यानंतर ही गाडी सुनिल मुडके यांच्या घराचे बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत लावली होती.

दरम्यान, रात्री पावणे बाराच्या सुमारास एका व्यक्तीने कारला आग लागल्याची माहिती दिली. त्यावेळी लिगाडे यांनी जाऊन पाहिले असता कार पेटलेल्या अवस्थेत दिसून आली. कारवर पाणी मारून आग विझविण्यात आली. परंतु आगीत कार मोठे प्रमाणात जळल्याने सुमारे ७ लाखांचे नुकसान झाले. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

पुणे: दोन चिमुरड्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे वाचली आजीची सोनसाखळी

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ खडसेंची निवड

नाना पटोलेविरोधी गट पुन्हा सक्रीय; हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत दाखल

Back to top button