सत्यजीत तांबेंच्या समर्थनार्थ राजीनामासत्र सुरुच; सोलापूरातील पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा | पुढारी

सत्यजीत तांबेंच्या समर्थनार्थ राजीनामासत्र सुरुच; सोलापूरातील पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य उपाध्यक्ष नितीन शिवशरण यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. सोलापूर शहर-जिल्ह्यात अनेक तांबे समर्थक पदाधिकारी व कार्यकर्ते असून आगामी काळात त्यांच्यासोबत कोण-कोण जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुक लागलेली असून सत्यजीत तांबे व अश्‍विनी पाटील हे दोन्ही अपक्ष उमेदवार निवडणुक रिंगणात आहे. गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने पक्षशिस्तीच्या उल्लंघनप्रकरणी ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे अश्‍विनी पाटील यांना शिवसेना (ठाकरे गट) यांनी पुरस्कृत केलेले असून सत्यजीत तांबे हे भाजपचा पाठींबा घेत निवडणुक लढवत असल्याच्या चर्चा आहेत.

तांबे यांचे पक्षातून निलंबन झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ राज्यातील विविध भागातून पदाधिकार्‍यांकडून राजीनामा देण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांबे समर्थक नितीन शिवशरण यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेश कमिटीकडे पाठवला आहे. युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्यजीत तांबे यांच्यासारखा युवक नेता हा महाराष्ट्राच्या सभागृहात असणे गरजेचे आहे. तांबे यांचे काम करण्याची पध्दत, सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याची त्यांची भूमिका ही युवा नेतृत्वासाठी आवश्यक आहे. त्यामुळे तांबे यांच्या समर्थनार्थ मी राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया शिवशरण यांनी दिली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button