पंढरपूर : अवैध वाळू उपसा विरोधात सलग तीन दिवस कारवाई; २ तराफा, १७ होड्या केल्या नष्ट | पुढारी

पंढरपूर : अवैध वाळू उपसा विरोधात सलग तीन दिवस कारवाई; २ तराफा, १७ होड्या केल्या नष्ट

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाद्वारे गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे सलग तीन दिवस धडक कारवाई करत 2 तराफा व 17 होड्या नष्ट केल्या आहेत.

भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पंढरपूर महसूल विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. या पथकद्वारे पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.

भीमा नदी पात्रातील इसबावी, भटुंबरे येथे गुरुवार दि. 29 रोजी अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली. त्यानुसार तेथे पथकाने छापा टाकून 1 तराफा व 9 होड्या ताब्यात घेऊन नष्ट केल्या आहेत. तर शुक्रवार दि. 30 रोजी पंढरपूर परिसरात 3 होड्या तर शनिवार दि. 31 डिसेंबर 2022 रोजी गोपाळपूर , मुंढेवाडी, देगाव येथे 1 तराफा 5 होड्या कारवाईत नष्ट केल्या आहेत. सदर ठिकाणी अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु असल्याचे निर्देशनास आले.

-हेही वाचा 

नागपूर नववर्ष स्वागतासाठी सज्ज : ३९ चेकपोस्ट, बंदोबस्तासाठी २५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात

राज्य सहकारी बँकेकडून 86 जणांना नियुक्ती पत्रे, पारदर्शी सेवक भरती प्रक्रियेबद्दल समाधान

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

Back to top button