सोलापूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक अधिका-याला लाच स्वीकारताना अटक | पुढारी

सोलापूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक अधिका-याला लाच स्वीकारताना अटक

सोलापूर : पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूर येथील नागरिकांनी कारखान्याविरुद्ध केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरिता तसेच परवाना देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणी केली. लाच स्वीकारताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने बुधवारी रात्री अटक केली.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, अजित वसंतराव पाटील (वय 50) असे अटक करण्यात आलेल्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराने साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन नूतनीकरण करावयाचे होते. तसेच साखर कारखान्याकडून हवा व पाणी प्रदूषण होत असल्याबाबत कारखान्याच्या आजूबाजूच्या लोकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या.

या साखर कारखान्याचा फार्मासिटिकल युनिटचे कंसेन्टन्स टू एस्टॅब्लिश हे लायसन्स प्रस्तावित होते. ही सर्व कामे करण्यासाठी तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी आणि दोन्ही प्रकारचे लायसन्स मिळण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

दरम्‍यान, तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडून तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी रात्री सात रस्ता परिसरातील पाटील याने तक्रारदाराकडून रोख दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगीहात पकडत त्‍याच्यावर कारवाई केली.

.हेही वाचा  

लोणी : लम्पी नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन सुविधा : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

दहावीच्या विद्यार्थांना मोठा दिलासा; आता होणार बारावी बोर्ड

Legislative Council : शाळांना सीसीटीव्ही सक्तीचे करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

Back to top button