पंढरपूर : श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचे निधन | पुढारी

पंढरपूर : श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचे निधन

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. प्रसन्न महाराज बेलापुरकर (वय ३३ ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पंढरपूर येथे श्री.संत निवृत्तीनाथ महाराज या मंदिराचे काम ते पाहत होते. त्‍यांच्या आकस्‍मिक निधनाने वारकरी संप्रदाय आणि त्‍यांचे शिष्यवर्गाला धक्का बसला आहे.

वारकरी संप्रदायातील सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून ह.भ.प. प्रसन्न महाराज बेलापुरकर यांची ओळख होती. प्रसन्न महाराज हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते कीर्तनाच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. आज ( दि. २६ ) पहाटे सहा वाजता झोपेतून उठल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटक्‍यामुळे त्‍यांचे निधन झाले. त्यांचे पश्चात त्यांचे चुलत बंधू व बेलापुरकर फडाचे गादीअधिकारी मनोहर महाराज बेलापुरकर यांच्यासह आई, भाऊ असा परिवार आहे.

 

हेही वाचा  

Back to top button