पंढरपूर तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ | पुढारी

पंढरपूर तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा परतीच्या पावसाने पंढरपूर शहर व तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्री सुरु झालेला पाऊस आज (बुधवार) सकाळी देखील सुरू होता. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पावसाने जोरदार बॅटींग केली. शेतातील ताली भरल्या असून, ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडता आलेले नाही. पावसाने धुमाकूळ घातल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.

परतीच्या पावसाने पंढरपूर तालुक्यात चांगली हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे ऊस पिकाला फायदा होत असला तरी डाळींब, बोर, द्राक्ष , पेरू पिकांना रोगराईची बाधा होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

पंढरपुर तालुक्याचे आजचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलप्रमाणे- 

करकंब- 13 मिमी
पट कुरोली 43 मिमी
भंडीशेगाव 29 मिमी
भाळवणी- 33 मिमी
कासेगाव – 45 मिमी
पंढरपूर- 35 मिमी
तुंगत- 00 मिमी
चळे- 19 मिमी
पुळुज 11 मिमी
आजचा एकूण पाऊस 228 मि.मी
————————————
सरासरी पाऊस 25.33 मि.मी.

हेही वाचा :  

Back to top button