सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे तलवारी विक्रीसाठी निघालेल्या तरुण बमसिंग पंचाक्षरी बमगोंडा (वय 27) या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील १६ हजार रुपये किमतीच्या चार तलवारी हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांकडून ही कारवाई जेऊर – करजगी रोडवर करण्यात आली.
याविषयी अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक काळे, पोलीस हवालदार अजय भोसले आठवडा बाजारात अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी निघाले होते. बमगोंडा फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यापूर्वी या तरुणावर गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकारणात त्याला जामीन मिळाला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, जेऊर येथे राहणारा बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा यास १६,००० रूपये किमतीच्या एकूण ४ नवीन तलवारींसह रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याविरूद्ध महादेव शिंदे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेवणसिध्द काळे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप काळे, पोलिस उपनिरीक्षक रेवणसिध्द काळे, पोलिस हवालदार अजय भोसले, पोलिस नाईक अल्ताफ शेख, सुभाष दासरे, नबिलाल मियॉवाले, महादेव शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा : र