सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या तारखेत बदल; ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान पार पडणार

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. एमपीएससीच्या परीक्षेमुळे हा बदल करण्यात आला आहे. त्यामूळे 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान होणारा युवा महोत्सव हा 9 ते 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय प्रशासनाकडून युवा महोत्सवाची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर विद्यार्थी विकास विभाग यांचे नियोजन करीत आहेत. सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व कला प्रकारांची तयारी सुरू करावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा
सोलापूर विद्यापीठ : परीक्षेस हजर ५० विद्यार्थी निकालात दाखवले गैरहजर
सोलापूर विद्यापीठामार्फत एमबीए प्रवेशासाठी कार्यशाळा
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भातील गोंधळ