पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भातील गोंधळ | पुढारी

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भातील गोंधळ

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भातील गोंधळ काही केल्या संपत नाही. कधी परीक्षा पद्धतीमध्ये बदल तर कधी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल आता तर परीक्षेतील प्रश्नपत्रिकाच्या कोड पद्धतीवरून गोंधळ सुरू झाला आहे. या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण वाढत आहे. सोलापूर विद्यापीठाच्या सत्र मार्च एप्रिल 2022 च्या पदवी व पदव्युत्तर परीक्षासंबंधी पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर सर्व शाखांच्या सर्व सत्राच्या परीक्षा ऑनलाईन एम सी क्यू बहुपर्यायी प्रश्नपद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे शासन निर्देशानुसार विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय सोलापूर विद्यापीठसह राज्यातील अन्य विद्यापीठाने घेतला होता. पण काही विद्यापीठाने परीक्षा ऑफलाईन बहुपर्यायी पद्धतीने घेतल्यामुळे तसेच कोरोनाच्या काळात सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासेस घेण्यात आले होते. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, लिखाणाचा देखील सराव नाही. परीक्षा ऑफलाइन बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात याव्या तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे पत्र सोलापुरातील विविध विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठाला देण्यात आले होते व विद्यापीठांसमोर विद्यार्थी संघटना आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केल्यामुळे विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल केला तसेच आषाढी वारीनिमित्त परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये. विद्यापीठाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला व परीक्षा 14 जुलैपासून बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

6 जुलै रोजी विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये काही जाचक अटी व नियम घालण्यात आले आहे यामध्ये विद्यापीठाच्या कुलगुरूने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करता प्रश्नपत्रिकेमध्ये बहुपर्यायी ओ.एम.आर. ऑफलाइन पद्धत राबवण्यात आले आहे याच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्हा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी 11 जुलै रोजी विद्यापीठांसमोर मुंडन आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकंदरीत विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या दृष्टीने मानसिक ताण वाढले आहे परीक्षा कधी होणार कशा होणार कोणत्या स्वरूपात होणार याबाबत मात्र अद्यापही संभ्रम अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. या संदर्भात सोलापूर विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक शिवकुमार गणपुरे यांना संपर्क साधल्यास त्यांनी फोन स्वीकारले नाही.

विद्यार्थी संघटनेचे म्हणणे.

ए बी सी डी इ एफ या स्वरूपात परीक्षा घेऊन जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा उद्देश
ओ.एम.आर. शीट भरण्यात भरताना चूक झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार
100 मार्काच्या परीक्षेत 30 मार्क अंतर्गत परीक्षेचे तर 70 गुणांची मुख्य परीक्षा असते. 50 मार्काच्या प्रश्नाला एक मार्क, मग उर्वरित 20

मार्क हिशोब कसा होणार?

60 मिनिटांचा वेळ वाढवून 90 मिनीट करण्यात यावे
परीक्षा नापास झाल्यास विद्यार्थ्यांना फोटोकॉपी अथवा पुनर्मूल्यांकन होणार नसल्यामुळे विद्यापीठाकडे दाद मागता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार

कुलगुरू समान न्यायव्यवस्थेच्या विरोधात काम करत आहेत. जाणीवपूर्वक काही परीक्षा पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू पाहत आहेत. याच्या निषेधार्थ सोमवारी विद्यापीठासमोर सर्व विद्यार्थी संघटना एकत्र येऊन मुंडण आंदोलन करणार आहोत.– केशव इंगळे,
सोलापूर विद्यार्थी संघर्ष समिती.

 

Back to top button