पुढारी ऑनलाईन : आषाढी एकादशीनिमित्त आज श्री विठ्ठल रूक्मिणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. यावेळी एकनाथ शिंदेंचे वडील संभाजी शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदें आणि त्यांचा नातू अशा ४ पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ४ पिढ्यांनी एकत्र दर्शन घेतलेले शिंदे पहिले मुख्यमंत्री आहेत.
गेल्या २० वर्षांपासून पंढरीची वारी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील रूई (ता.गेवराई) गावातील मुरली नवले आणि जिजाबाई नवले यांना महापूजेला मानाचे वारकरी होण्याचा मान मिळाला. दिल्ली दौरा आटाेपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रात्री पुणेमार्गे पंढरपूरला पोहचले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदेंसह कुटुंबीयही उपस्थित होते. यामध्ये एकनाथ शिंदेंचे वडील संभाजी शिंदे आणि नातू देखील उपस्थित होते. महापूजेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांनी ४ पिढ्यांनी दर्शन घेणे आपले भाग्य असून असं भाग्य सर्वांनाच मिळावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदेंच्या कुटुंबाचा हा एक अनोखा योगायोगच म्हणावा लागेल.
हेही वाचलंत का?