कोंढवा : 'महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा वापर करेन. सामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्याला प्रगतिपथाकडे नेण्यासाठी प्रयत्न केला जाईल,' असे प्रतिपादन नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिंदे यांचे शनिवारी रात्री विमानतळावर प्रमोद भानगिरे यांनी स्वागत केले. या प्रसंगी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अजय भोसले, युवासेनेचे प्रदेश संघटक किरण साळी, उद्योजक बाळासाहेब भानगिरे तसेच पुणे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बाळासाहेब भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, गणेश भानगिरे, प्रकाश तरवडे, विशाल वाल्हेकर यांनी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले. शिंदे म्हणाले, 'पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकार पाठिंबा देईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.'