सोलापूर : वरदायनी उजनी धरणाने गाठला तळ | पुढारी

सोलापूर : वरदायनी उजनी धरणाने गाठला तळ

बेंबळे; पुढारी वृत्तसेवा : पाऊस नाही- नाही म्हणत गतवर्षी उजनी धरण १११% म्हणजे १२३ टीएमसीने भरले होते. पण आज त्यातील पाण्याचा उपयुक्त साठा संपल्याने उजनी धरणाने तळ गाठला आहे. यामुळे वरदायनी उजनी धरणाचा प्लसमधून मायनसमध्ये २-३ दिवसात प्रवेश होणार हे नक्की आहे.

२०२० आणि २०२१ ला उजनीचा पाणीसाठा याच महिन्यात प्लसमधून मायनसमध्ये जाणार आहे. तीन वर्षापुर्वी १५ मे २०१९ रोजी उजनी धरण उणे ३८ टक्क्यावर होते. तर पाणीसाठा ४३.१६ टीएमसी होता. त्या तुलनेत गेले तीन वर्षी धरणात मे महिन्याच्या मध्यावर ही अचल पाणीसाठा ६७.७७ टीएमसी आहे. पावसाळा सुरू होईपर्यत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचनाचा व पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्भवणार नाही. असे असले तरी सध्या मुख्य कालव्यातून २३०० क्युसेक, बोगदा ६०० तर सीनामाढा २९६ क्युसेकने विसर्ग धरणातून सुरू आहे. त्यामुळे पावसाळा चालू होईपर्यंत आणखी किती पाणीसाठा खालावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उजनी धरणाच्या १२३ टीएमसी पाणीसाठ्यापैकी ५४ टीएमसी पाणी उपयुक्त तर ६३ टीएमसी हा मृतसाठा धरला जातो, तर ६ टीएमसी पाणी अतिरिक्त पाणी आहे. कारण उजनी धरण १००% भरते त्यावेळी ११७ टीएमसी पाणी असते आणि १११ टक्के पाणी साठवले जाते त्यावेळी पाणीसाठा १२३ टीएमसी होते. सध्या उजनी धरणातील ६३ टीएमसी पाणी संपले आहे.

उजनी धरणातील पाण्यावर किमान ४५ साखर कारखाने व दहा औद्योगिक वसाहती चालतात. तसेच सोलापूर शहरासह शेकडो गावांचा पाणीपुरवठा याच धरणाद्वारे होतो, तर हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय ही होते. यामुळे उजनी धरणाला राजकीय, अर्थिक व सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष उजनीच्या पाण्यावर लागून राहिले आहे.

उजनी धरणातून गेल्या आठ दिवसापासून दररोज एक टक्का  पाणी कमी होत आहे. आज उजनी धरणाची पाणीसाठा ७.६९%  इतका खाली आला असून तोही पुढील ४-५ दिवसात संपणार आहे. त्यामुळे उजनी धरण उपयुक्त (प्लस) साठ्यातून मृतसाठ्यात (मायनस) प्रवेश करणार आहे. सध्यस्थितीत उजनी कालवा, बोगदा, सीनामाढा जलसिंचन योजनेत पाणी सोडले जात आहे. धरणकाठचा उपसा सिंचन, बाष्पीभवन आदी कारणामुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने खालावणार हे नक्की.

 १९ धरणाची पाणीपातळी घटू लागली

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या १९ धरणाचा ही पाणीसाठा मायनसकडे चालला आहे. यातील १९ पैकी ६ धरणे ५% च्या आसपास आहेत. त्यात पिंपळगाव जोगे 0.00% , माणिकडोह-८.१८%, विसापूर- २.०७%, कळमोडी- ६.६२%, मुळशी- ७.७४%, टेमघर- ७.७६% तर इतर ४ धरणे १२% च्या आसपास आली आहेत. त्यात वडज- १३.२० %, डिंभे-११.०४%, घोड-१४.०२%, वडिवले-१०.७३% आहेत. तर राहिलेल्या ९ धरणाची पाणीपातळी उत्तम स्थितीत आहेत.

सध्या यावर्षी उजनी धरणातील पाणीपातळी

एकूण पाणीपातळी –  ४९१.६०५ मीटर
एकूण क्षेत्रफळ – १९६.८१ चौ. कि. मी.
एकूण पाणीसाठा  – १९१९.५० दलघमी
उपयुक्त  साठा   –   ११६.६९ % दलघमी
एकूण पाणीसाठा  –  ६७ .७७ टी.एम.सी.
उपयुक्त साठा    –  ४.१२ टी.एम.सी.
टक्केवारी       –   ७.६९ टक्के

विसर्ग

नदी – बंद
कालवा – २३०० क्युसेक
बोगदा – ६००
सिना-माढा सिंचन योजना – २९६
उजनीत सध्या ६७.७७ टीएमसी एकूण पाणीसाठा आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा स्वार्थासाठी ४.१२ टीएमसी आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button