पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू | पुढारी

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील प्रशांत रामभाऊ घाळे (वय ३२) या युवकाचा विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला असताना जागीच मृत्यू झाला.

शुक्रवारी प्रशांत याच्या घरी जागरण-गोंधळाचा कार्यक्रम होता. त्यासाठी पै -पाहुणे आले होते. शनिवारी तो भाच्यांना घेवून गावातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. अगोदर प्रशांत हा विहिरीत उतरत बराच वेळ पोहला.

परंतु त्यानंतर तो बाहेर आलाच नाही. त्यामुळे त्याच्या भाच्यांनी आरडाओरडा केला. तो ऐकून लगतचे लोक मदतीसाठी आले. काही तरुणांनी विहिरीत उतरत त्याला बाहेर काढले. त्याच्या कपाळाला गंभीर जखम झाल्याचे दिसून आले. तातडीने त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.

Back to top button