सोलापूर : विद्युत तारांचा शॉक लागून २ कर्मचारी गंभीर | पुढारी

सोलापूर : विद्युत तारांचा शॉक लागून २ कर्मचारी गंभीर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : वीज तारांची दुरुस्ती करताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने दोघांना विजेचा जोरात शॉक लागला. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले. यातील गंभीर अवस्थेत असणाऱ्या एकाला खासगी रुग्णालयात तर दुसऱ्याला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सोलापुरात बुधवारी (दि. ११) रोजी वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे कामे केली जात आहेत. रामलाल चौक शाखेअंतर्गत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ तंत्रज्ञ शेख रब्बानी अहमद (वय अंदाजे ३७ वर्षे) व कंत्राटी कर्मचारी अझहर चाँद तांबोळी (वय अंदाजे २२ वर्षे) हे दोघेजण सिव्हील वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के.व्ही. रामलाल चौक फिडरवर रेल्वे स्टेशन परिसरातील एका ठिकाणी विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम करत होते. याकरिता त्यांनी महावितरणच्या शिडीगाडीची मदत घेतली होती. यात दरम्यान दोघांना अचानक विजेचा तारांचा शॉक लागला. आणि दोघेजण गंभीर जखमी झाले.

या घटनेतील गंभीर असलेल्या एकाला शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. तर दुसऱ्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट दिले होते का नाही? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button