महिला लाटणं घेऊन रस्त्यावर उतरल्या तर... सुप्रिया सुळेंचा इशारा | पुढारी

महिला लाटणं घेऊन रस्त्यावर उतरल्या तर... सुप्रिया सुळेंचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

लाटणं घेऊन महिला रस्त्यावर उतरल्या तर केंद्र सरकारला दिल्लीत बसायला जागा मिळणार नाही आणि पळायलाही जागा मिळणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाईच्या प्रश्नावरून केंद्र सरकारला इशारा दिला.

Big Breaking : राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित

बुधवारी राष्ट्रवादी कँग्रेसच्यावतीने पुण्यात शनिपार चाैकात वाढत्या महागाई विरोधात आंदोन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी कँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुशकाकडे, रुपाली पाटील ठोंबरे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेधनोंदवला.

थरार! धाडसानं आई काठी घेऊन धावली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकलीची केली सुटका

यावेळीसुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करताना मोदीजी आम्ही तुमच्यावर नाराज नाही आम्ही हैराण आहोत. तुम्ही एवढे असंवेदनशील कसे झालात. मला सुषमा स्वराज यांचे युपीए सरकार सत्तेत असताना ‘आकडो से पेट नही भरता जब भूख लगती है तो धान और रोटी लगता है’ असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला होता. सामान्य माणसाची ती भावना होती. आता तर त्यावेळेसपेक्षा महागाई दुप्पट वाढली आहे. सुषमाजी संवेदनशील होत्या. तुमची संवेदनशीलता कुठे गेली? अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.

Asani cyclone : असनी चक्रीवादळ पोहोचले आंध्र प्रदेशमध्ये; समुद्र किनाऱ्यावर मुसळधार पाऊस

मोदीजींनी कोवीड प्रश्नावर बैठक घेतली. चांगला निर्णय होता. या प्रश्नी सर्वांनी त्यांना सहकार्य केलेच पाहिजे. पण याच बैठकीत महाराष्ट्र सरकार काहीच करीत नाही, महाराष्ट्राने टॅक्स कमी केला नाही म्हणून महागाईवाढल्याचे त्यांचे म्हणणे काही पटले नाही. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशात काय महाराष्ट्रामुळे महागाईवाढली काय? आज लिंबू दहा रुपयाला एक झाले आहे. आरे आलेल्या पाहुण्याला लिंबू सरबतही देता येत नाही. मोदीजी महिलांचा अंत पाहू नका. लवकर राज्यांशी चर्चा करा. माहागाईतून सामान्य जनतेला सुटका द्या. अन्यथा महिला जर लाटणं घेऊन रस्त्यावर उतरल्या, तर केंद्र सरकारला बसायला जागा मिळणार नाही, असा इशारा तदेतानाच महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आवाज उठवणार असल्याचे सुळे यांनीयावेळी सांगितले.

Back to top button