सोलापूर : ही दोस्ती तुटायची नाय! एकाचवेळी निघाली तीन मित्रांची अंत्ययात्रा | पुढारी

सोलापूर : ही दोस्ती तुटायची नाय! एकाचवेळी निघाली तीन मित्रांची अंत्ययात्रा

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : पुणे-मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात सोलापुरातील तीन मित्रांचा मृत्यू झाला. या तिघांवर बुधवारी सकाळी शहरातील मोदी स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. एकदम जीवलग असलेल्या त्या तिघांची अंत्ययात्राही एकत्रच निघाली. हा क्षण पाहून नागरिकांच्या भावनेचा बांध फुटला.

पुणे-मुंबई महामार्गावरील खोपोलीजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात सोलापूर शहरातील फॉरेस्ट भागातील गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिध्दार्थ राजगुरु या तरुणांनी आपला जीव गमावला. दरम्यान त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मृत गौरव खरात हे काँग्रेस पक्षात होते. हे तिघे मित्र मंत्री नितीन राऊत यांना भेटण्यासाठी जात असताना अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या जिवलग मित्राच्या अंत्ययात्रेवेळी मोठी गर्दी झाली होती.

सुशिलकुमार शिंदे घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली आणि या दुदैवी घटनेबाबत त्‍यांनी शोक व्यक्‍त केला.

हे ही वाचलं का  

Back to top button