सातारा : केळवली धबधब्यात बुडालेला युवक अद्याप बेपत्ताच

सातारा : केळवली धबधब्यात बुडालेला युवक अद्याप बेपत्ताच

परळी: पुढारी वृत्तसेवा : केळवली धबधब्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या युवकाचा अजुनही तपास सुरु आहे. शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून सुरु असलेला तपास रात्री उशीरापर्यंत सुरु राहणार आहे. घटनास्थळी तहसीलदार आशा होळकर तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसलेसह रेक्स्यू टीम तळ ठोकून आहेत.

सातारा येथील तीन युवक शुक्रवारी दुपारी धबधबा पाहण्यासाची गेले होते. यावेळी राहुल माने (वय १८) हा युवक धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाला. यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. भीतीपोटी ते युवक सातारला परतले. शुक्रवारी सायंकाळी उशिराने कुंटुंबियांना ही घटना समजल्यानंतर तालुका पोलिस स्टेशनमध्ये घटनेची माहिती दिली. मात्र, ज्या ठिकाणी तो युवक बेपत्ता झाला होता. त्याठिकाणी रात्री उशीरा तपास करणे शक्य नसल्याने सातारा पोलीस दल तसेच ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी तपास यंत्रणेला सुरुवात केली.

शनिवारी पहाटे लवकर माने कुटुंबियांचे नातेवाईक मित्र परिवार केळवलीमध्ये दाखल झाले. यानंतर सातारा तालुका पोलीसदलाचे कर्मचारी दाखल होत शोधकार्य सुरु केले. मात्र, त्यांनाही अद्याप यश आलेले नाही. सकाळी आकरा वाजता तहसीलदार आशा होळकर, मंडल अधिकारी युवराज गायकवाड यांनीही शोधकार्यात सहभाग घेतला. दुपारी ३ वाजता छ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेसह रेक्स्यू टीमचे जवान साहित्यासह दाखल झाले. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने, मोठ- मोठे दगड आणि खोल पाणी यामुळे शोधकार्य करण्यात अडथळा निर्माण होत होता.

एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात येईल : तहसीलदार होळकर

खोल पाण्याचा प्रवाहात आत्याधुनिक पाण्यात बुडून शोध घेण्याचे साहित्य उपलब्ध नसल्याने वरिष्ठांशी बोलून पुण्यातील एनडीआरएफ टीमला बोलवून उद्या तपास घेण्यात येईल, असे तहसीलदार आशा होळकर यांनी 'दैनिक पुढारी' शी बोलताना सांगितले.

केळवली धबधबा परिसरात शोधकार्य सुरु असल्याने धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांसाठी मज्जाव करण्यात आला. शनिवार -रविवार असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओघ मोठा होता. मात्र, धबधबा परिसरातील घटनेची माहिती मिळताच पर्यटकांना तपास पूर्ण होवूपर्यंत मज्जाव करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news