कोयना विभागात पावसाचा जोर वाढला

कोयना विभागात पावसाचा जोर वाढला

पाटण ः पुढारी वृत्तसेवा कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यातील बहुतांश ठिकाणी बुधवारी पावसाचा जोर वाढला आहे. संततधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ सुरू आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 49,325 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मागील चोवीस तासांत 4.26 टीएमसी पाण्याची आवक झाली असून पाणी उंचीत 7 फूट 11 इंचांनी वाढ झाली आहे. धरणात सध्या एकूण 40.63 टीएमसी इतका पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्‍त साठा 35.63 टीएमसी इतका आहे. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी पाच वाजता कोयना धरण पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

मुळातच पूर्वेकडील विभागातील पाऊस, कोयना नदीपात्राची वाढलेली पाणी पातळी आणि धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे कोयना नदी पात्रातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे .
प्रशासनाकडून वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आल्या असून खबरदारी व उपाययोजनांसाठी प्रशासन तयार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे. कोयनेसह अन्य छोट्या मोठ्या नद्या,ओढे,नाल्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने त्या परिसरातील लोकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी सर्वच ठिकाणी दमदार पाऊस सुरू आहे. मंगळवार सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच या चोवीस तासातील पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे- कोयना 159, नवजा 191, महाबळेश्वर 220. धरणाची एकूण स्थिती लक्षात घेता येथे एकूण पाणीसाठा 40.63 टीएमसी, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 35.63 टीएमसी, पाणीउंची 2095 फूट, जलपातळी 638.556 मीटर इतकी झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 64.62 टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणात सध्याचा उपलब्ध पाणीसाठा व आगामी काळातील पाऊस लक्षात घेता बुधवारी सायंकाळी धरण व्यवस्थापनाने कोयना धरण पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्यूसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडले आहे. या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील बहुतांशी भागात अपेक्षित पाऊस पडत असल्याने कोयनेसह छोट्या, मोठ्या नद्या , नाले, ओढ्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे संबंधितांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान कोयना धरणात पावसाळ्यातील पाऊस व त्या त्या दिवसासाठी घालून दिलेला पाणीसाठा लक्षात घेता सध्या धरणात अपेक्षेइतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. म्हणूनच आगामी काळातील पाऊस, येणार्‍या पाण्याचे प्रमाण, पूर्वेकडे सोडावे लागणारे पाणी, संभाव्य महापुराची तीव्रता आदी सर्व गोष्टींचा विचार करून बुधवारी सायंकाळी कोयना धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या धरणात सरासरी चार टीएमसी पाण्याची आवक होत आहे. लवकरच पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्याचा विचार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाचे उपअभियंता आशिष जाधव यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news