सातारा
सातारा : शेतकऱ्याने ३ एकर ऊसाला लावली काडी; अन् ऊस तोडण्यास नकार देणाऱ्या कामगारांचा केला सत्कार
सातारा : पुढारी वृत्तसेवा साताऱ्यात कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांनी स्वतःचा तीन एकरातील ऊस पेटवून दिला. राज्यकर्त्यांमुळे ऊस पेटवून देण्याची वेळ आली असल्याचा आरोप करत दोन्ही साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी ऊस तोडण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांनी ऊसाला पालापाचोळा जास्त असल्याचे कारण देत ऊस तोडण्यासाठी नकार दिल्याने त्यांना शाल श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचाही त्यांनी सत्कार केला.
गेली 20 महिने झाले ऊसाचे पीक शेतात उभे आहे.अद्याप गाळप न झाल्याने ऊसाच्या वजनात घट होणार असल्याने राज्य सरकारचा निषेध करत तीन एकर क्षेत्रातील ऊस पेटवून दिला.
राजेंद्र बर्गे, शेतकरी
हेही वाचलंत का?
- अनोखा विवाह सोहळा! सात एचआयव्ही पॉझिटिव्ह जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी; साईओ, पोलिस अधिक्षक बनले वधु-वरांचे मामा
- भारताने कोरोना परिस्थिती चीनपेक्षा चांगल्यारितीने हाताळली; जो बायडेन यांच्याकडून भारताचे कौतुक
- शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय पवार यांना उमेदवारी निश्चित, कट्टर शिवसैनिकाला दिली संधी
- Ketki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक एजंट जेरबंद

