माण, खटाव तालुक्यात चारा छावण्या सुरु करा: पृथ्वीराज चव्हाण

माण, खटाव तालुक्यात चारा छावण्या सुरु करा: पृथ्वीराज चव्हाण

कराड: पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे तिथे दुष्काळजन्य परिस्थिती उदभवली आहे. या गावांमध्ये जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने या भागात तत्काळ चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व मदत-पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सातारा जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पाऊस पडला असला तरी माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने या भागात दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे. माण व खटाव तालुक्यातील दुष्काळजन्य गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर गावांमध्ये तत्काळ चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे. तसेच पशुधन वाचविण्यासाठी या दुष्काळग्रस्त भागात त्वरित चारा छावण्या सुरु करण्याकरिता चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news