Shardiya Navratri 2026 ten days festival - यंदा नवरात्रौत्सव राहणार दहा दिवसांचा

Shardiya Navratri 2026 ten days festival - यंदा नवरात्रौत्सव राहणार दहा दिवसांचा
Navratri
NavratriPudhari
Published on: 
Updated on: 

कराड : यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार आहे. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे नवरात्रोत्सव कधी आठ किंवा दहा दिवसांचा साजरा होतो. यंदा सप्तमी तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार आहे. गेल्या वर्षीही म्हणजेच २०२५ मध्ये तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्रोत्सव दहा दिवसांचा होता. यंदा दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार असून, त्यासाठी सर्वत्र तयारीला वेग आला आहे.

आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. यंदा रविवारी (दि. ११) नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, याच दिवशी घटस्थापना केली जाणार आहे. या दिवशी दिवसभर वैधृति योग असला तरी पहाटे ४ वाजून ५६ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल.

Navratri
Jaykumar Gore | पदवीधरमधून स्मितादेवी जाधव यांना मताधिक्क्याने निवडून आणू : ना. गोरे

नवरात्रोत्सवात देवीला रोज एक माळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यंदा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याने रोज एक याप्रमाणे माळा अर्पण कराव्यात. तिथीची वृद्धी असल्याने दोन दिवसांच्या दोन स्वतंत्र माळा देवीला अर्पण कराव्यात. अनेकजण नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवस उपवास करतात. मात्र, काही कारणास्तव नऊ दिवस उपवास करणे शक्य नसल्यास नवरात्रोत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास केला जातो.

Navratri
Satara | आठ वर्षाच्या मुलीने न चुकता सादर केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा, एकटत पाहत राहिले छ. उदयनराजे भोसले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news