Navratri colors 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांसाठी ९ शुभ रंग! कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान कराल? आजपासूनच करा तयारी

नवरात्रातील प्रत्येक दिवसाचा संबंध एका विशिष्ट रंगाशी जोडला जातो. नवरात्रातील कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करणे शुभ मानले जाते, ते जाणून घेऊया.
Navratri colors 2026
Navratri colors 2026File Photo
Published on: 
Updated on: 

Navratri colors 2026

नवी दिल्ली : यंदा शारदीय नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून, देवी दुर्गेच्या नऊ स्वरूपांची भक्तिभावाने उपासना करण्याचा पवित्र काळ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या नऊ दिवसांत देवीची मनोभावे पूजा केल्यास जीवनात सुख-शांती आणि सकारात्मकता वाढते.

ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रातील प्रत्येक दिवसाचा संबंध एका विशिष्ट रंगाशी जोडला जातो. त्यामुळे देवीला प्रिय मानल्या जाणाऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास शुभ फळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. नवरात्रातील कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करणे शुभ मानले जाते, ते जाणून घेऊया.

Navratri colors 2026
Apta leaves health benefits: दसऱ्याला 'सोनं' म्हणून वाटली जाणारी आपट्याची पानं फेकू नका; पाहा आयुर्वेदिक फायदे 

पहिला दिवस – पिवळा किंवा नारंगी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी पिवळा किंवा नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. या रंगांमुळे उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी धार्मिक मान्यता आहे.

दुसरा दिवस – पांढरा

दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. देवीला पांढरा रंग प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. यामुळे मनःशांती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे.

तिसरा दिवस – लाल

तिसरा दिवस माता चंद्रघंटेला समर्पित असतो. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करणे शुभ मानले जाते. लाल रंग भक्ती, शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.

चौथा दिवस – गडद निळा

चौथ्या दिवशी माता कूष्मांडेची पूजा केली जाते. या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. या रंगाचा संबंध स्थैर्य आणि सकारात्मक परिणामांशी जोडला जातो.

पाचवा दिवस – हिरवा

पाचवा दिवस माता स्कंदमातेला समर्पित असतो. या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. हिरवा रंग समृद्धी, वाढ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.

सहावा दिवस – राखाडी

सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करण्याची धार्मिक परंपरा आहे. यामुळे मानसिक संतुलन आणि स्थैर्य टिकून राहते, अशी मान्यता आहे.

सातवा दिवस – जांभळा किंवा नारंगी

सातव्या दिवशी माता कालरात्रीची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी जांभळ्या किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. या रंगांमुळे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

आठवा दिवस – गुलाबी

आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. गुलाबी रंग प्रेम, सौहार्द आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.

नववा दिवस – फिकट निळा

नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी फिकट निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. हा रंग ज्ञान, शांतता आणि यशाचे प्रतीक असल्याचे मानले जाते.

Navratri colors 2026
Ganapati cigarette offering: गणपतीला चक्क सिगारेट अर्पण केली जाते; माउंट ब्रोमोवरील हिंदूंची अनोखी परंपरा, काय आहे कारण?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news