परळी : पुढारी वृत्तसेवा – किल्ले सज्जनगडावरील रामघळ परिसरात काही युवक आज (दि.२०) दुपारी ३.३० च्या दरम्यान भटकंती करत होते. यावेळी त्यांना अचानक बिबट्याचा बछडा खेळताना दिसला. अचानकच दिसलेल्या बिबट्याच्या बछड्याचे दर्शनाने युवकांची भंबेरी उडाली, युवक तसेच चार पावले मागे आले. मात्र, त्या परिसरात बिबट्या नसल्याची खात्री झाल्याने त्यांचे धाडस वाढले. बछड्याचे फोटो काढले.
ही घटना सज्जनगडावर समजताच युवकांची गर्दी वाढली. त्यातील काहींनी ही माहिती तत्काळ वनधिकाऱ्यांना कळविली. मात्र, दुपारी ४ वाजेपर्यंत वनखात्याचे अधिकारी पोहोचले नव्हते. याबाबत तालुका वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सज्जनगडकडे रवाना होत असल्याचे त्यांनी सांगितले. सज्जगडावर बिबट्याचा वावर होता. यावर आता बिबटय़ाचा बछडा आढळून आल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचलंत का ?