यंदा तीन दिवस उशीराने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, राज्यातून 1 ते 5  ऑक्टोबरच्या आसपास सुरू होणार परतीचा प्रवास | पुढारी

यंदा तीन दिवस उशीराने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, राज्यातून 1 ते 5  ऑक्टोबरच्या आसपास सुरू होणार परतीचा प्रवास

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राजस्थानचा दक्षिण पश्चिम भाग आणि कच्छ भागापासून मान्सूनचा मंगळवारपासून (दि.20) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. एरवी सरासरी 17 सप्टेंबरच्या आसपास  मान्सूचा परतीचा  प्रवास  सुरू होत असतो. यावेळी तीन दिवस उशीरा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्रातून 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान मान्सून परतीचा प्रवास करणार आहे.

देशात गेल्या चार महिन्यापासून जून महिना वगळता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्यातही मान्सून मनसोक्त बरसला. अजुनही बरसत आहे. आता मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राजस्थानच्या दक्षिण पश्चिम तसेच कच्छ भागापासून हा प्रवास मंगळवारपासून सुरू झाला आहे. मान्सून परतीच्या प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्यामुळे राज्यातूनही पुढील आठ ते दहा दिवसात परतीचा प्रवास करण्याची दाट शक्यता आहे.

मान्सून परतीच्या प्रवास करण्यासाठी तीन महत्वाची कारणे आहेत. त्यामध्ये हवेचे 850 हेक्टा पास्कल वर आले आहेत. तर अ‍ॅन्टी सायक्लॉन सक्युलेशन (चक्रीवादळाचा विरोधी प्रवाह ) तसेच कोरडे हवामान, मागील 5 दिवसांपासून पाऊस न होणे, या कारणामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असतो.

वास्तविक पाहता मान्सूनचा परतीचा प्रवास 1 सष्टेंबरपासूनच सुरू  होतो. तर 1 ऑक्टोबरनंतर पूर्ण देशातून मान्सून निघून जात असतो. मात्र कधी-कधी मान्सूनचा प्रवास लांबतो.

Back to top button